Posts

Sink the Bismarck !

Image
एक जहाज बुडवण्यासाठी ! प्रास्ताविक : मायबाप अभ्यासकांनो आणि वाचकांनो ! आज २४ मे २०२०. तसं ही खास करून लक्षात ठेवावी अशी तारिख नक्कीच नाही. पण आज पासून ७९  वर्षांपूर्वी म्हणजे २४ मे १९४१ साली अटलांटिक महासागरात डेन्मार्कच्या समुद्रधुनीत एक प्रचंड नाविक  संग्राम सुरु झालेला होता, जो २७ मे १९४१ रोजी संपला. या नाविक संग्रामामुळे दुसऱ्या महायुद्धाचे पारडे  जरी पूर्ण फिरले नाही तरी या संग्रामाचे दूरगामी परिणाम युद्धाच्या अंतिम निकालावर झाले यात वाद नाही.  या चार दिवसात ३६०० हुन अधिक नौसनिकांना आपले प्राण गमवावे लागले. या घटनेवर मी २०१५ साली  माहितिलेख लिहायला घेतला होता, जो गेली पाच वर्षे अपुराच होता. यंदा या घटनेस ७९ वर्षे पूर्ण होत  आहेत त्यामुळे हा माहितिलेख मी नेट (मराठी नेट, इंग्रजी नाही !) लावून पूर्ण करून आज आपल्यासमोर प्रस्तुत करणार आहे. वास्तविक या लढाईचे दोन भाग केले जातात. १. डेन्मार्क च्या समुद्रधुनीतील लढाई (२४ मे १९४१) २. बिस्मार्कची अंतिम लढाई. (२५ मे ते २७ मे १९४१) पण मी या लेखात दोन्ही भाग एकच करून माहिती सांगणार आहे. या लढाईबाबत अनेक डिटेल्स उपलब्ध आहेत. अनेक अनुभवींच्या कथ